झोमॅटो, पॉसिली बाजार, पीबी फिंटेक आणि नायका यांच्यासह इतर कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे भरपूर नुकसान झाले आहे. शुक्रवारी NSE वर पेटीएमचा शेअर 1.89 टक्क्यांनी घसरून 833.85 रुपयांवर बंद झाला. दिवसाच्या व्यवहारादरम्यान, तो 831.00 रुपयांपर्यंत घसरला होता, जो आतापर्यंतचा सर्वात कमी आहे. परिणामी आत्तापर्यंत, गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत 46.58 टक्क्यांनी घट झाली आहे.
Paytm सह, फिनो पेमेंट्स बँकेचे शेअर्स शुक्रवारी NSE वर 4.12 टक्क्यांनी घसरून 309.30 रुपयांवर बंद झाले. नोव्हेंबर 2021 मध्ये लिस्टिंग झाल्यापासून स्टॉकमध्ये 43 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. कारट्रेडच्या (CarTrade) शेअर्सनेही आज 583 रुपयांचा नवा नीचांक गाठला. ऑगस्ट 2021 मध्ये लिस्टिंग झाल्यापासून, शेअरची किंमत आतापर्यंत 60 टक्क्यांहून अधिक घसरली आहे.
फूड डिलिव्हरी ॲप Zomato चे शेअर्स देखील आज 3.76 टक्क्यांनी घसरून 85.80 रुपयांवर बंद झाले. 2022 मध्ये आतापर्यंत या शेअरची किंमत सुमारे 39.30 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर फॅशन जगतातील, Nykaa चे शेअर्स देखील आज 3.51 टक्क्यांनी घसरून 1,397 रुपयांवर बंद झाले. 2022 च्या सुरुवातीपासून Nykaa चे शेअर्स सुमारे 33 टक्क्यांनी घसरले आहेत.