मुंबई – छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. यामध्ये तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता शैलेश लोढा याने मालिका सोडल्याच्या बातमीने प्रेक्षकांना धक्काच बसला होता. त्यातच आता आणखी एका कलाकाराने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.
मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट गेल्या काही एपिसोडमध्ये दिसला नाही. त्यामुळे तो लवकरच मालिकेचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र याबाबत वाहिनीकडून किंवा कलाकारांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, सोढीच्या भूमिकेत दिसलेला गुरचरण सिंग असो, बावरीची भूमिका साकारणारी मोनिका भदौरिया असो, अंजली मेहताची भूमिका साकारणारी नेहा मेहता असो किंवा सोनूच्या भूमिकेतील २ अभिनेत्री असो, ‘तारक मेहता…’मधील अनेक कलाकारांनी याआधीच मालिका सोडली आहे. तसेच पहिल्या टप्पूने म्हणजेच भव्य गांधीनेदेखील मालिका सोडली होती.