मॉस्को – चीनच्या सोशल मीडिया कंपनी टीकटॉक ने काल शुक्रवारी मोठी घोषणा केली. या कंपनीने lचालू वर्षाच्या सुरुवातीला रशियन वापरकर्त्यांसाठी महत्त्वाच्या सेवा बंद केल्यानंतर आता या आपल्या कंपनीतील रशियन कर्मचारी संख्या कमी करण्याचा घेतला आहे.
रशियाने फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर कठोर नवीन मीडिया सेन्सॉरशिप लागू करण्यात आली आहे. सेच चीनच्या मालकीच्या व्हिडिओ अॅप टीक टॉक ने रशियामध्ये थेट प्रक्षेपण आणि नवीन व्हिडिओ अपलोड करणे बंद केले आहे.”रशियातील आमच्या सेवेबद्दल आम्हाला यावर्षी अनेक निर्णय घ्यावे लागले आहेत, ज्यामध्ये दुर्दैवाने आमचे रशियातील कर्मचारी यांच्या कपातीचाही समावेश आहे,” असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
“आम्ही आमचे सर्वोच्च प्राधान्य म्हणून सुरक्षिततेसह आमच्या सेवा पुन्हा केव्हा सुरू करू शकतो हे निर्धारित करण्यासाठी आम्ही रशियामधील विकसित परिस्थितींचे मूल्यांकन करणे सुरू ठेवू,”असेही टीक टॉकने आपल्या निवेदनात म्हटले आहे.