संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

टी-20 सामन्यात आज वेस्ट इंडिजसोबत भारतीय संघाची टक्कर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोलकाता- पाहुण्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर आता टी-20 मालिकेवर आपले नाव कोरण्यासाठी भारतीय संघ उद्या बुधवारी कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर उतरणार आहे. टी-20 सामन्यात वेस्ट इंडिज संघ नेहमीच चांगलीच कामगिरी करतो. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला कडवी टक्कर देण्यासाठी भारतीय खेळाडूंनी आज मैदानावर कसून सराव केला. या मालिकेचा पहिला सामना कोण संघ जिंकतो? हे आता पाहावे लागणार आहे.

एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर पूर्णपणे वर्चस्व राखताना 3-0 असा विजय मिळवला होता. त्यामुळे आता भारतीय संघ टी20 मालिकेतही हीच विजयाची लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. तसेच यापुढील टी-20 मालिका संघांसाठी महत्त्वाच्या असणार आहेत. कारण यावर्षाच्या अखेरीस टी20 विश्वचषक होणार असून त्यादृष्टीने तयारीसाठी टी20 मालिका महत्त्वाच्या ठरणार आहेत.
याच टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली खेळणार्‍या भारतीय संघाला देखील संघबांधणीचा विचार करावा लागणार आहे. तसेच वेस्ट इंडिज हा संघ टी20 क्रिकेटमधील एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भारतीय संघाने बुधवारीपासून सुरू होणार्‍या टी20 मालिकेपूर्वी चांगलाच घाम गाळला. भारताच्या सराव सत्राचे फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केले असून या फोटोंना ‘टी20 मोड ऑन’ असे कॅप्शनही देण्यात आले आहे. या फोटोंमध्ये रोहित शर्मा, रिषभ पंत, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड यांसह भारतीय संघातील इतर खेळाडूंही दिसून आले. टी20 मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला तीन मोठे धक्के बसले असून भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित उपकर्णधार केएल राहुल, फिरकीपटू अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे तिन्ही खेळाडू दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेला मुकणार आहेत. त्यामुळे बीसीसीआयने या तिघांच्या जागेवर बदली खेळाडूंची निवड केली. ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा आणि कुलदीप यादव यांची टी20 मालिकेसाठी बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने या टी20 मालिकेपूर्वी रिषभ पंत याच्याकडे भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. तो केएल राहुलच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत प्रभारी उपकर्णधारपद सांभाळेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami