संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 29 March 2023

टेस्ला कंपनीने हुबेहुब बनविला
माणसासारखा दिसणारा रोबोट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कॅलिफोर्निया – माणसांसारखे काम करणारे रोबोट आपण अनेक चित्रपटांत पाहिले आहेत. अगदी हूबेहूब काम करणारे हे रोबोट सर्वांनाच आश्चर्यचकित करतात. मात्र, चित्रपटांत दिसणारी ही कल्पनाशक्ती आता केवळ चित्रपटांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्युमनॉइड रोबोटचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी एआय डे इव्हेंटमध्ये ह्युमनॉइड रोबोट ऑप्टिमस लॉन्च केला आहे. हा रोबोट हुबेहुब माणसासारखा दिसतो. या रोबोटची किंमत तब्बल 16 लाख रुपये इतकी आहे.
हा रोबोट तुम्हाला अनेक प्रकारच्या कामातही मदत करेल. त्याची रचना अगदी माणसांसारखी बनवली आहे. सध्या हा रोबोटचा प्रोटोटाईप दाखविण्यात आला आहे. स्टेजवर चालण्याबरोबरच या रोबोटने बसलेल्या प्रेक्षकांसमोर हातही हलवले. यासंदर्भात एक व्हिडिओ दाखविण्यात आला. ज्यामध्ये रोबोट एक बॉक्स उचलत होता. याशिवाय झाडांना पाणीही देत आहे. टेस्लाचा ह्युमनॉइड रोबोट ऑप्टिमस अनेक कामे सहजतेने पूर्ण करू शकतो हे यावरून दिसून येते. टेस्ला ऑफिस, कॅलिफोर्निया येथे एआय डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मस्क यांनी सांगितले की, शक्य तितक्या लवकर उपयुक्त मानवी रोबोट तयार करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. मस्क यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या रोबोटबद्दल पहिल्यांदा माहिती दिली होती. आता त्याचा प्रोटोटाईप दाखवण्यात आला आहे. मस्कच्या मते, इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी लाखो ऑप्टिमस तयार करेल. या रोबोटची किंमत साधारण 16 लाख रुपये असेल. मस्क यांनी पुढे सांगितले की, कंपनी येत्या 3 ते 5 वर्षांत ऑर्डर घेणे सुरू करेल. मात्र, या रोबोटवर अजून बरेच काम करायचे आहे. मात्र, साधारण 5 ते 10 वर्षांत या रोबोटमध्ये अनेक बदल दिसून येतील असेही कंपनीने म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या