संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

टोयोटा कंपनीवर सायबर हल्ला; कंपनीचे जपानमधील प्लांट बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

टोयोटा मोटार्सवर सायबर हल्ला झाल्यामुळे मंगळवारी जपानमध्ये कंपनीचे सर्व प्लांट बंद ठेवण्यात आले आहेत. बुधवारपासून ते पूर्ववत सुरू होतील, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. सायबर हल्ल्यामुळे कंपनीच्या सुटे भाग व्यवस्थापन प्रणालीत अडथळे निर्माण झाले. त्यामुळे जपानमधील कंपनीचे कारखाने बंद ठेवले आहेत, असे व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले.

टोयोटा मोटारचे जपानमध्ये १४ प्लांट आहेत. हिनो मोटर्स आणि दैहत्सु मोटर्स या टोयोटाच्या उपकंपन्या आहेत. त्यांना सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या २८ पैकी १४ लाईन सायबर हल्ल्यामुळे बाधित झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे कामकाज थांबवले आहे. परिणामी जपानमधील कंपनीचे १४ कारखाने आज बंद केले आहेत. बुधवारी ते पुन्हा सुरू होतील. टोयोटा कंपनीला प्लास्टिकच्या सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या कोजिमा इंडस्ट्रीजवर सायबर हल्ला झाला. मंगळवारी सकाळी त्यांनी याची माहिती दिली. खंडणीची मागणी करणारा मेल त्यांना मिळाला आहे. प्रणालीत व्हायरस आला असल्याची पुष्टी कोजिमा इंडस्ट्रीजने दिली आहे. सायबर हल्ल्याचा आम्हाला फटका बसला हे खरे आहे. त्यामुळे झालेले नुकसान आम्ही आताच जाहीर करत नाही. टोयोटाची उत्पादन प्रणाली पुन्हा सुरू करण्याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. ते शक्य तितक्या लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कोजिमा इंडस्ट्रीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami