संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

ट्रकचालक आंदोलनामुळे कॅनडातील भारतीयांना सावध राहण्याची सूचना

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ओटावा – कॅनडाची राजधानी ओटावात ट्रक चालकांचे सुरू असलेले आंदोलन संपण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे कॅनडातील भारतीयांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला कॅनडाच्या भारतीय उच्च आयुक्तालयाने दिला आहे. कॅनडातील भारतीय नागरिक आणि भारतीय प्रवाशांच्या मदतीसाठी त्यांनी आपत्कालीन हॉटलाइन सुरू केली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीवरून १३ दिवसांपासून ओटावात ट्रक चालकांचे आंदोलन सुरू आहे. भारतातील शेतकरी आंदोलनाबाबत उपदेशाचे डोस पाजणारे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या वक्तव्यावरून त्यांच्याच पक्षाच्या खासदाराने हल्ला चढवला आहे. ‘आपण त्यांच्या वक्तव्याशी आणि धोरणांशी असहमत असल्याचे खासदार जोएल लाईटबाउंड यांनी म्हटले आहे. त्यांनी प्रांतीय कॉकस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आंदोलकांना मी मदत करू शकत नाही. माझी खंत व्यक्त करू शकत नाही. निवडणूक प्रचारातील सरकारची धोरणे आणि सूर आता बदलले आहेत’, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेनंतर कॅनडातील भारतीयांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय कॅनडात प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami