संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

ट्रक-दुचाकीच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भंडारा- तुमसर-बपेरा राज्य मार्गावर उभ्या टॅ्रक्टर ट्रॉलीला दुचाकीने धडक दिल्याची घटना काल मध्यरात्री घडली. या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. योगेश प्रल्हाद बुरडे (29) असे मृत तरुणाचे नाव आहे. योगेश हा काही कामानिमित्त तुमसरला गेला होता. परतीच्या वेळी गावाकडे येत असताना चुल्हाड गावालगत उभ्या टॅ्रक्टर ट्रॉलीला त्याच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami