वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अखेर पुन्हा ट्विटरवर पुन्हा परतणार आहेत. त्यांच्यावर घातलेली बंदी ट्विटरने मागे घेतली आहे, अशी घोषणा ट्विटरचे नवे मालक एलन मस्क यांनी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घालण्याचा ट्विटरचा निर्णय नैतिकदृष्ट्या चुकीचा होता, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा ट्विटरवर परतणार आहेत. वापरकर्ते मीम्स व्हायरल करून त्यांचे ट्विटरवर स्वागत करत आहेत.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर ६ जानेवारीला अमेरिकेत हिंसाचार उसळला होता. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवले होते. ट्विटरवरून त्यांनी लोकांना भडकवल्याचा आरोप झाल्यामुळे ट्विटरने त्यांच्यावर बंदी घातली होती. डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवर ८८ कोटी फॉलोवर्स होते. काही दिवसांपूर्वी टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सला ट्विटर विकत घेतले आहे. त्यामुळे आता ते ट्विटरचे नवे मालक आहेत. त्यांनी डोनाल्ड ट्रम्पवरील बंदी मागे घेतली असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा ट्विटरवर सक्रिय होणार आहेत. एलन मस्क यांच्या या घोषणेनंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस सुरू झाला आहे. वापरकर्त्यांकडून भन्नाट मीम्स व्हायरल केले जात आहेत. काहींनी ट्रम्प यांच्या स्वागतासाठी ते तयार केले आहेत.