संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

ट्रेन सुटण्याच्या एक तास आधी
पुणे रेल्वे स्टेशनवर हजर व्हा!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे -विमानातळाप्रमाणेच आता प्रवाशांना रेल्वे स्टेशनवरही एक तास आधी पोहोचावं लागणार आहे. नियोजित ट्रेन सुटण्याच्या आधी एक तास प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर पोहोचावं, असा सल्ला रेल्वे व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे. पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये चेन खेचून ट्रेन थांबवण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हे सांगण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.
पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडी प्रचंड वाढली आहे. या कोंडीमुळे प्रवासी रेल्वेच्या वेळेत पोहोचत नाहीत. परिणामी काही प्रवाशांचे नातेवाईक जाणूनबुजून ट्रेन सुरु झाली की चेन ओढतात. रेल्वेच्या चेन खेचण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. या गोष्टीचं गांभीर्य ओळखून हे प्रकार कमी करण्यासाठी रेल्वे व्यवस्थापनाकडून प्रवाशांना नियोजित ट्रेनच्या एक तास आधी स्टेशनवर येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान रेल्वेमधील चेन खेचण्याच्या 1164 घटना घडलेल्या आहेत. यात 914 प्रवाशांना अटक देखील करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांच्याकडून एक लाख 80 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. यात तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे. त्यामुळे चेन खेचून दंड भरण्याची वेळ ओढवून घ्यायची नसेल तर प्रवाशांनी एक तास आधीच रेल्वे स्टेशनवर पोहचण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami