सॅन फ्रांसिस्को – ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आता ट्विटरने भारतातील तीन कार्यालयांपैकी दोन कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालये बंद होणार असून, फक्त बंगळूरू येथील कार्यालय सुरू राहणार आहे.
यापूर्वी ट्विटरने भारतातील ९० टक्के म्हणजे २०० पेक्षा अधिक कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले होते. तर, भारतातील ट्विटरची दोन्ही कार्यालये बंद केल्यानंतर, कर्मचार्यांना घरूनच काम करण्यास सांगितले होते. त्यांनतर आता भारतातील ट्विटरचे सर्व काम हे फक्त बंगळुरूमधून सुरू राहणार आहे.