संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

ट्विटरची भारतासह जगभरातील कंपनीत कर्मचारी कपातीचा निर्णय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – ट्विटरची मालकी मिळवल्यानंतर एलन मस्क कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कंपनीच्या जगभरातील ७५०० कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. शुक्रवारी मस्क यांनी भारतातील ट्विटरच्या बहुतांश कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे.भारतातील ट्विटर कंपनीत साधारण २५० कर्मचारी काम करत आहेत. दरम्यान,कॅलिफोर्नियामध्ये मात्र कर्मचाऱ्यांची कपात सुरू केल्यानंतर तेथील कर्मचारी न्यायालयात गेले आहेत.
ट्विटरमधून कर्मचारी काढताना इंजिनियरिंग, सेल्स,मार्केटिंगआणि कम्युनिकेशन या विभागांतील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे.भारतात केली गेलेली नोकरकपात हा जगभरातील नोकरकपातीचाच एक भाग असल्याचे विश्वासू सूत्रांनी सांगितले.मात्र अशा पद्धतीने अचानक कामावरून काढताना नोकरी सोडताना मस्क नेमके काय पॅकेज देतात,याविषयी कोणतीही स्पष्ट कल्पना ट्विटरने दिलेली नाही.या नोकरकपातीबाबत वृत्तसंस्थेने ईमेलद्वारे ट्विटरकडे चौकशी केली असता, प्रतिसाद मिळू शकला नाही.ट्विटरचा महसूल घटल्याचे कारण मस्क यांनी या नोकरकपातीसाठी दिले आहे.जाहिरातदारांवर दबाव आणू पाहणाऱ्या गटांमुळे हा महसूल घटला आहे, असा आरोप करताना लोकांकडून प्रसारित करण्यात येणाऱ्या माहितीमध्ये ट्विटरकडून कोणताही फेरफार करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान,ट्विटरचे मालकी हक्क मिळताच मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.यामध्ये कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांचाही समावेश आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami