नवी दिल्ली – ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांना ज्या-ज्या गोष्टी त्रास देतात त्या सर्व विकत घेण्याचा धडाका मस्क यांनी लावला आहे. जगातील सर्वात मोठी मायक्रोब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरच्या फेक अकाऊंटची इलॉन मस्क यांना अडचण होती. त्यामुळे त्यांनी थेट ट्विटरच विकत घेतलं. आता ते सतत ट्विटरमध्ये बदल करत आहेत. ट्विटवर ब्लू टिक्स फी बेस्ड करण्यासारख्या निर्णयाचा या बदलांमध्ये समावेश आहे. आता मस्क स्वत:चा स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहेत. स्मार्टफोन मार्केटमध्ये मस्क यांना अॅपल, गुगल आणि सॅमसंगसारख्या बड्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे.
काही दिवसांपूर्वीच अॅपलच्या वतीने एका ट्विटमध्ये आणखी एक पर्यायी फोन आणणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान अॅपल आणि गुगल प्ले स्टोअरमधून ट्विटर हटवल्याबद्दल ट्विटरवर चर्चा झाली होती. त्याला उत्तर देताना इलॉन मस्क यांनी फोन घेऊन या असे म्हटले आहे. मी आशा करतो की फोनची निर्मिती करण्याची मला गरज पडणार नाही. परंतु, दुसरा कोणताही पर्याय नसेल तर मी पर्यायी फोन बनवेन, असे इलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.