न्यूयॉर्क – ट्विटरपाठोपाठ आता ॲमेझॉनमध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरुवात केली आहे. नोकरीवरुन काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेलद्वारे पूर्वकल्पना देण्यात आली. दुसरी नोकरी शोधण्यासाठी कंपनीकडून या कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
या नोकर कपातीच्या सर्वाधिक फटका ‘डिव्हाइसेस अँड सर्व्हिसेस` विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. आठवड्याभरात ॲमेझॉनकडून विविध विभागांमधून तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाण्याची शक्यता आहे. दुसरी नोकरी शोधण्यास अपयशी ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून आर्थिक साहाय्य केले जाणार आहे. रोजगार मिळवण्यासाठी मदतही केली जाणार आहे.