मुंबई – राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवले. बहुमत सिद्ध करा अशा आशयाचे हे पत्र होते. परिणामी महाविकास आघाडी सरकारला आता बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, शिवसेनेचे व्हीप यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उद्या होणारी बहुमताची चाचणी बेकायदा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर आज सकाळी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेला 3 वाजेपर्यंत कागदपत्र सादर करायला सांगितलं होते. त्यावर आता 5 वाजता सुनावणी होणार आहे.
39 आमदारांपैकी कोणीही पाठिंबा परत घेतल्याचे पत्र राज्यपालांना दिले नसल्याचे नमूद करून विरोधी पक्ष नेत्यांच्या विनंतीवरून ही चाचणी घेण्यात येणार आहे. राज्यघटनेत अशी कोणतीही तरतूद नाही असे याचिकेत म्हटले आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय राज्यपाल असा आदेश देऊ शकत नाहीत, असेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता काही वेळातच ठाकरे सरकारचा फैसला होणार आहे.