संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची माझ्यात नशा; किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्य सरकार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यामधील संघर्ष आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. आज किरीट सोमय्या यांनी आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, मी आयुष्यात कधी विडी, सिगारेट बिअर प्यायलो नाही. अंडही खाल्लं नाही. माझ्यात नशा आहे ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची, माझ्यात नशा आहे उद्धव ठाकरेंच्या माफियागीरीला संपवण्याची, माझ्यात नशा आहे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला लुटणाऱ्या आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडून पैसे आणण्याची, अशा शब्दांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर इशारा दिला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, कोरोना काळात कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केले. वडील उद्धव ठाकरे आदेश देतात की त्या संबंधित कंपनीला काम देऊ नका, पण त्यांचेच पुत्र आदित्य ठाकरे त्या कंपनीला काम देतात. पैशासाठी तुम्ही मुंबई आणि पुणेकरांचा जीव धोक्यात घातला होता. ५८ कोटी रुपयांचे कंत्राट सुजित पाटकर यांना मुंबई महापालिका आयुक्त चहल यांनी दिले. हा सुजित पाटकर संजय राऊत यांचे निकटवर्ती आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

यावेळी किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली, ते म्हणाले की, संजय राउत यांनी जे घोटाळे केले त्याचे एकही उत्तर देण्यासाठी तयार नाहीत. एका किरीट सोमय्या याची हत्या झाली तर 100 किरीट सोमय्या तयार होतील. संजय राऊत हे मोठ्या हिमतीने सांगत आहेत की, लालू प्रसाद यादवांना भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगामध्ये टाकले आहे. त्यामुळे त्यांनाही तुरुंगामध्ये जावं लागतं की काय, असे राऊतांना वाटू लागले आहे, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami