मुंबई : ठाण्यातील पश्चिमेला असणारे वर्दळीचा परिसर कासार वडवली पासून घाटकोपर ते वडाळा असा मार्ग असणार आहे. त्यासोबत वडाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस मेट्रो मार्ग ११ चे काम मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाकडे देण्यात आले. त्यामुळे पुढील काही महिन्यात ठाणे ते सीएसएमटी सरळ मेट्रो मार्ग प्रकल्प वेगाने पूर्ण होईल.
मुंबईला जोडण्यासाठी कासारवडवली-घाटकोपर-वडाळा या मेट्रो ४ प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. याच मार्गिकेला मेट्रो ४ अ प्रकल्पाद्वारे गायमुख ते कासारवडवली अशी जोडही दिली जाते. त्यातून गायमुख ते वडाळा तसेच मेट्रो ११ असलेल्या वडाळा ते सीएसएमटी मार्गाला जोडला जाणार आहे. यामुळे थेट आता ठाणे ते सीएसएमटी मेट्रो प्रवास शक्य होणार. यासाठी ‘एमएमआरसी’कडे आता साडेआठ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या उभारणीचे काम सोपविण्यात आले आहे.