संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

ठाणे भारत सहकारीसह ५ बँकांवर दंडाची कारवाई

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने ठाणे भारत सहकारी बँकेसह ५ बँकांवर दंडाची कारवाई केली आहे. बेंगळुरू येथील कर्नाटक स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक, झाशी येथील राणी लक्ष्मीबाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, तामिळनाडूतील नेल्कोसन को-ऑपरेटिव्ह नागरी बँक आणि राउरकेला येथील अर्बन कॉपरेटिव्ह बँक यांचा त्यात समावेश आहे. गृहकर्जासंबंधीच्या बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कर्नाटक स्टेट को-ऑपरेटिव बँकेला आरबीआयने २५ लाखांचा दंड ठोठावला आहे. बेकायदा इलेक्ट्रॉनिक्स बँकिंग व्यवहार प्रकरणी ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेडला १५ लाखांचा दंड ठोठावला आहे. राणी लक्ष्मीबाई को-ऑपरेटिव्ह बँकेला ५ लाख आणि नेकोल्सन को-ऑपरेटिव्ह बँकेला २ लाख तर द अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला १० हजारांचा दंड रिझर्व्ह बँकेने ठोठावला आहे. बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर दंडाचा बडगा उगारण्याचे धोरण आरबीआयने अवलंबले आहे. त्यात आत्तापर्यंत अनेक बँकांना दंड ठोठावला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami