संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

ठाणे महापालिका कर्मचार्‍यांना 18 हजार रुपये बोनस मिळणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ठाणे- मुंबई महापालिका कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त बोनस जाहीर झाला आहे. त्यानंतर आता ठाणे महापालिका कर्मचार्‍यांनाही 18 हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. मागील वर्षी 15,500 रुपये बोनस मिळाला होता. यंदा त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

म्युनिसिपल लेबर युनियनचे नेते रवी राव आणि उपाध्यक्ष मोहन तिवारी यांनी काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत ठाणे महापालिका कर्मचार्‍यांना सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता बोनस देण्याबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक भुमिका घेऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासोबत ऑनलाईन चर्चा केली. त्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर ठाणे महापालिका कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त 18 हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami