संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

ठाणे सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी
येत्या ८ सप्टेंबरला निविदा उघडणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*सिव्हील रुग्णालयाच्या स्थलांतराचा मार्ग मोकळा

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील सिव्हील रुग्णालयाच्या जागेवर सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदा येत्या गुरुवारी ८ सप्टेंबर रोजी उघण्यात येणार आहे.त्यामुळे आता या जुन्या सिव्हील रुग्णालयाचे मनोरुग्णालय इमारतीच्या परिसरात स्थलांतर करण्याची प्रक्रिया येत्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.दरम्यान, राज्य सरकारने या ९०० खाटांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी ५२७ कोटी ४१ लाखांचा निधी आधीच मंजूर केला आहे. या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीसाठी विविध ठेकेदारांकडून ६ सप्टेंबरपर्यत निविदा मागविण्यात आल्या होत्या.आता या निविदा गुरुवार ८ सप्टेंबर रोजी उघडण्यात येणार असून त्यानंतर १५ दिवसात हे जुने सिव्हील रुग्णालय पाडण्यास सुरुवात होणार आहे.हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय १० मजल्यांचे आणि दोन इमारती आणि तीन तळमजल्याच्या स्वरुपात बांधले जाणार आहे.त्याआधी या जागेवरील सध्याचे सिव्हील रुग्णालयाचे विविध विभाग मनोरुग्णालय परिसरात तात्पुरते हलवले जाणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.नवीन रुग्णालयात २०० खाटा महिला,लहान मुलांसाठी असून ५०० खाटा जनरल वॉर्डातील रुग्णांसाठी असणार आहेत.यामध्ये मुलांच्या वार्डासह प्रसूती वॉर्ड, नेत्र विभाग , रक्तपेढी असणार आहे.जुन्या सिव्हील रुग्णालयातील सर्जरी,फिजिओथेरपी, आर्थो,नाक,कान,घसा विभाग,अतिदक्षता विभाग आणि जनरल विभाग काही काळ त्याच ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. निविदा प्रकीयेस विलंब होत असल्याने सिव्हील रुग्णालयाचे स्थलांतर रखडले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami