संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

ठाण्यात दोन वेळागोळी बार! 4 जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ठाणे : ठाण्यामध्ये दोन वेळा गोळीबाराची घटना घडली आहे. अज्ञातांकडून पहाटे नवपाडा घंटाळी परिसरातील गोळीबारानंतर पुन्हा एकदा वर्तकनगर येथे गोळीबार झाला आहे.घंटाळी येथे 3 जण जखमी तर वर्तकनगरमध्ये 2 जण जखमी झाले आहेत.जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून या दोन्ही घटनांचे तपास क्राइम ब्रांच करत आहे.

ठाण्यात सणासुदीच्या दिवसांत दोन ठिकणी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सकाळी पहाटेच्या सुमारास ठाण्यातील नवपाडा घंटाळी परिसरात अज्ञातांकडून गोळीबार झाला असून यात 3 जण जखमी झाले आहेत. तर वर्तकनगर येथेही गोळीबाराची दूसरी घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात गण्या जाधव ऊर्फ गण्या काळ्या हा हिट लिस्टेड गुन्हेगार आहे.त्याच्यावरती अज्ञात लोकांनी गोळीबार केला आहे.जंगलातील ही घटना असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात हा गुन्हेगार बचवला असून अज्ञात गोळीबार करणारे फरार झाले आहेत.घटनास्थळी क्राईम ब्रांच आणि वर्तकनगरचे पोलीस घटनेचा तपास करत आहेत.हा गँगवॉरचा प्रकार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami