संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

ठाण्यात पाणीपुरवठा पाईपलाईन फुटली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ठाणे- ठाण्यातील माजिवडा परिसरात पाण्याची पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. एकीकडे ठाणे शहराला पाण्याची टंचाई भासत असतांना लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. पाण्याची पाईप लाईन फुटल्याने संपूर्ण रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यावरून जाणार्या टँकरच्या धडकेने ही पाईप लाईन फुटल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर ही पाईपलाईन मीरा भाईंदर महानगरपालिकेची असून या ठिकाणी आता ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम दाखल झाली होती. पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. एकुण 1350 मिलीमीटर व्यासाची ही पाईपलाईन आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami