संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

डिजिटल चलन सुरू करण्याचा ठोस निर्णय अद्याप तरी नाही – अर्थमंत्री

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

देशात डिजिटल चलन येणार असल्याचा चर्चा सुरू आहेत. मात्र याबाबत अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर संचालक मंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बँकांच्या समस्यांवर सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे बँकांची कार्यक्षमता वाढून विश्वासार्हतेत सुधारणा झाली आहे, असं सितारामन यांनी सांगितले. बँकांच्या थकित मालमत्तेतही घट झाल्याचेही त्या म्हणाल्या. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास म्हणाले की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चलनवाढीचा दर 4 पूर्णांक 5 शतांश टक्के होता. दुसऱ्या तिमाहीत 5 पूर्णांक, तर तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत दर 4 आणि 4 पूर्णांक 2 शतांश टक्के राहण्याचा अंदाज आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami