डेल्टा प्लसमुळे मध्य प्रदेशात महिलेचा मृत्यू

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

उज्जैन – हाहाकार माजविणारी कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच देशात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ या नव्या प्रकारामुळे प्रचंड चिंता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येणार अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यातच ‘डेल्टा प्लस’मुळे मध्य प्रदेशात पहिला मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये डेल्टा प्लसची तीन प्रकरणे नोंदली असून उज्जैनमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. यातील चार जण बरे झाले आहेत, मात्र एकाचा मृत्यू झाला आहे. उज्जैन येथील महिलेच्या कोरोनामुळे मृत्यूनंतर त्यांचे नमुने घेतले होते. हे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी दिल्लीला पाठविण्यात आले होते. त्यांच्या अहवालात डेल्टा प्लस हा नवीन प्रकार आढळला आहे.

उज्जैनचे नोडल अधिकारी डॉ. रौनक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डेल्टा प्लस व्हेरियंटची बाधा झाल्याने एका २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या पतीलाही कोरोनाची लागण झाली होती. पतीने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. ते विषाणूतून बरे झाले आहेत. मात्र महिलेने लसीचा एकही डोस घेतला नव्हता.’

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami