संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

डॉक्टर मारायच्या लायकीचे! संभाजी भिडे बोलले…

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमरावती – वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. ‘जेवढा शिकलेला माणूस तेवढा गाढव आहे. डॉक्टर लोक हे नालायक आहेत, ते लुटारू आहेत. डॉक्टर मारायच्या लायकीचे’, असे धक्कादायक वक्तव्य संभाजी भिडेंनी केले आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

संभाजी भिडे हे अमरावती दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, ‘कोरोनाच्या काळात लोक ही भीतीमुळे मेली. जी वाचली ती जगण्याच्या लायकीची नाही. माणूस जेवढा शिकला तेव्हा तो गाढव. डॉक्टर हे नालायक आहेत, ते रुग्णांना लुटतात. हे डॉक्टर मार खाण्याच्या लायकीचे आहे. त्यांच्याकडे कधी जाऊ नका’, असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच या सभेत एकजण मास्क घालून बसला होता, ते पाहून संभाजी भिडे यांनी त्याला मास्क काढण्यास सांगितले आणि म्हणाले, ‘तू मराठी माणूस आहे, हा कोरोना हे थोतांड आहे. डॉक्टर हे नालायक आहे. कोरोनाच्या काळात या डॉक्टरांनी लोकांना लुटलं आहे, लोकांना खाल्लं त्यामुळे डॉक्टरांकडे कधी जाऊ नका’, असा सल्लाच भिडेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे डॉक्टरांमध्ये नाराजी असून डॉक्टरांच्या संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. भिडे यांनी याआधीदेखील कोरोनाबाधितांबाबत वक्तव्य केले होते. ज्यांना कोरोना होतोय, ते जगायच्या लायकीचे नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami