संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

डॉ. भूषण पटवर्धन ‘नॅक’च्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – पुणेस्थित आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांची राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या (‘नॅक’) कार्यकारी समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. दीर्घकाळानंतर नॅकच्या अध्यक्षपदी डॉ. पटवर्धन यांच्या रूपाने मराठी व्यक्तीची निवड झाली आहे. प्रा.जगदेशकुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नॅकचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून डॉ. पटवर्धन यांची नॅकच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सध्या कोविड-१९ वरील आंतरविद्याशाखीय आयुष आर आणि डी टास्क फोर्सचे अध्यक्ष, डॉ. पटवर्धन हे जवळपास ४० वर्षांपासून एक प्रतिष्ठित शिक्षणतज्ञ आहेत आणि एनआयटीआय आयोग, नियोजन आयोग, लॅन्सेट सिटिझन्स कमिशन, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन आणि युनायटेड नेशन्स आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सह अनेक शैक्षणिक संशोधन आणि धोरण समित्यांचे सदस्य आहेत. दरम्यान, नॅक प्रक्रियेत आवश्यक असलेल्या गुणात्मक सुधारणा सुचवण्यावर त्यांचा भर असल्याचे डॉ. पटवर्धन यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील मान्यता आणि मूल्यांकन प्रक्रिया संरेखित करणे असेलच शिवाय नॅक माझ्यासाठी नवीन नाही, कारण मी त्याचा एक भाग होतो असेही ते म्हणाले. नॅकच्या अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल यूजीसीचे आभार मानले. मला हे देखील माहित आहे की सर्वत्र सुधारणेला वाव आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॅकला एनइपी शिफारशींशी संरेखित करणे आवश्यक आहे. कारण धोरणानुसार काय आवश्यक आहे यावर आधारित जर मूल्यांकन केले गेले नाही तर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार नाही, असेही डॉ पटवर्धन म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami