संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 07 February 2023

डोंबिवलीच्या भागशाळा मैदानातील महोत्सवाला क्रीडाप्रेमींचा विरोध !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

उपोषण आंदोलनाचा इशारा

डोंबिवली – डोंबिवली शहराच्या पश्चिमेला असलेल्या सुभाष छेद रस्त्यावरील कान्हाजी जेधे मैदान म्हणजेच भागशाळा मैदानात १४ दिवस कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मात्र या महोत्सवाला स्थानिक क्रीडाप्रेमी,ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विरोध दर्शविला आहे.सुट्टीच्या काळात मुलांना मौजमजा करण्यासाठीच्या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिका व्यापारी हेतुने मैदान मनोरंजनासाठी काही संस्थांना देऊन मुले, क्रीडाप्रेमी,ज्येष्ठांचा हिरमोड का करत आहे, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
या मैदानावर होणार्‍या कोकण महोत्सवाला प्रशासनाने परवानगी देऊ नये,अन्यथा मैदानाबाहेर उपोषण आंदोलन छेडले जाईल असा इशारा खेळाडू आणि नागरिकांनी दिला असून त्याच्या समर्थनासाठी सह्यांची मोहीम सुरू केली आहे.भाजपचे डोंबिवली पदाधिकारी राजेश म्हात्रे, मॉर्निग क्रिकेट क्लबचे तुषार भोईर आणि अन्य खेळाडूंनी या आंदोलनासाठी पुढाकार घेतला आहे.कोणत्याही परिस्थितीत पालिकेने डोंबिवली पश्चिमेतील एकमेव प्रशस्त भागशाळा मैदान कोकण किंवा अन्य कोणत्याही महोत्सवासाठी देऊ नये. भागशाळा मैदान हे पालिकेचे मैदान असले तरी नागरिकांच्या सोयींचा विचार करुन सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे स्वखर्चातून या मैदानाची देखभाल करतात. मैदान समतल, पाणी, बाकडे अशी व्यवस्था म्हात्रे यांनी मैदानात उपलब्ध करुन दिली आहे. स्वतः काही करायचे नाही आणि दुसरा कोणी चांगले काम करत असेल तर त्यात विघ्न आणायचे ही पालिकेची भूमिका योग्य नाही, असे अंबरनाथच्या ‘डीएमसी’ कंपनीचे निवृत्त महाव्यवस्थापक सी. डी. प्रधान यांनी सांगितले. पालिकेला पैसा कमवायचा असेल तर त्यांनी इतर मैदानांचा वापर करावा, असेही ते म्हणाले.
दरवर्षी दिवाळीच्या सणाच्या काळात कडोंमपाकडून काही लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने भागशाळा मैदान महोत्सव, उत्सव कार्यक्रमासाठी १५ ते २० दिवसांसाठी दिले जाते. मैदानात विविध प्रकारचे खाऊचे बाकडे, कर्णकर्कश आवाजाची खेळाची साधने, मनोरंजन नगरी असा जामानिमा असतो. या कालावधीत मैदानात चालण्याच्या गोल मार्गिके व्यतिरिक्त एक इंच जागा मोकळी नसते.दररोज शेकडो वाहने महोत्सावासाठी येतात. मैदान परिसरातील अरुंद रस्त्यांवर ती उभी केली जातात.या भागात महोत्सव काळात दररोज वाहन कोंडी होते,असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami