संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

डोंबिवलीत घराला भीषण आग! एकाच कुटुंबातील ४ जण भाजले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ठाणे- डोंबिवलीच्या भोपरमध्ये आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घराला आग लागली. त्यात एकाच कुटुंबातील ४ जण भाजून जबर जखमी झाले. आई आणि २ मुली ९० टक्के भाजल्या आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना एम्स या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

डोंबिवली जवळच्या भोपर गावातील बस स्टॉपजवळ प्रसाद पाटील यांचे घर आहे. आज पहाटे ५ च्या सुमारास त्यांच्या घराला आग लागली. त्यावेळी घरातील सर्वजण साखर झोपेत होते. आगीत प्रसाद पाटील त्यांची पत्नी प्रीती, १४ वर्षांची मुलगी समीता आणि ११ वर्षांची समीक्षा या तिघी भाजून जखमी झाल्या. आगीत या तिघी ९० टक्के भाजल्या आहेत. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. आगीचे कारण समजलेले नाही. मायलेकींची प्रकृती चिंताजनक आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami