संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यावर हल्ला; डोळ्यात मिरचीपूड टाकून बेदम मारहाण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

डोेंबिवली – डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना आज सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. भाजपचा कार्यकर्ता आपल्या दुकानात बसला असताना अचानक दोघे अज्ञातजण घुसले आणि त्यांनी डोळ्यांत मिरची पूड फेकली. तसेच बांबूने त्याला बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

डोंबिवलीतील भाजपचे कार्यकर्ते मनोज कटके हे आज आपल्या पेट शॉपमध्ये बसले होते. सकाळी 10 च्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या दुकानात अचानक शिरल्या आणि त्यांनी बांबूने कटके यांना बेदम मारहाण केली. ऐवढेच नाही तर त्यांच्या डोळ्यात मिरचिची पूड फेकून त्यांनी नंतर तेथून पळ काढला. कटके हे ओरडत असल्याचे पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना रिक्षात घालून शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. याची माहिती मिळताच भाजपचे डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांसह भाजप कार्यकर्त्यांनीही रुग्णालयात धाव घेत कटके यांची चौकशी डॉक्टरांकडे केली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी आमदार चव्हाणांना दिली. भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. पोलिसांनी लवकरात लवकर हल्लेखोरांना अटक करावी, अशी भाजपची मागणी असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami