संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

डोंबिवलीनजीक खदानीच्या पाण्यात बुडून २ मुलांचा मृत्यू ! चौघांना वाचवले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

डोंबिवली – शहरानजीकच्या भोपर भागातील खदानीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा तेथील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.आयुष केदारे (१३ ) आयुष मोहन गुप्ता (१४) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाची नावे आहेत. सुदैवाने यातील चार मुलांना वाचविण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना आले आहे.
काल रविवारी दुपारच्या सुमारास डोंबिवलीतील आयरे गावातील ६ लहान मुले या खदान परिसरात सायकल चालवित असताना खदानीचे पाणी पाहून खदानीत पोहण्यासाठी गेले होते.मात्र त्यांना खदानीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. आरडा ओरड झाल्याने काही ग्रामस्थाचे या मुलांकडे लक्ष गेल्याने त्यांनी खदानीच्या दिशेने धाव घेतली.याबाबत तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.खदानीमध्ये पोहण्यास मनाई ग्रामस्थ व अग्निशमन विभागाच्या मदतीने ६ मधील ४ जणांना वाचवण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. मात्र यामधील आयुष केदारे आणि आयुष मोहन गुप्ता ही दोन मुले बुडाली.अग्नीशमन दलाच्या जवानांना तासाभराच्या प्रयत्नानंतर या दोघांचाही मृतदेह सापडला आहे.तर कीर्तन म्हात्रे,पवन चौहान,परमेश्वर घोडके, अतूल औटे या चार मुलांना वाचविण्यात आले.दरम्यान या खदानीमध्ये पोहण्यास मनाई आहे.मात्र अनेकदा लहान मुले,तरुण या ठिकाणी पाहण्यासाठी येत असतात.त्यामुळे आता या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami