संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

तपासात सहकार्य करत नसल्यामुळे चित्रा रामकृष्ण यांच्या सल्लागाराला अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चेन्नई – काही वर्षांपूर्वी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये (एनएसई) झालेल्या गोंधळाच्या प्रकरणी सीबीआयने आनंद सुब्रमण्यन यांना अटक केली आहे. आज सकाळी ही माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. अनेक अनियमितता राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे आनंद सुब्रम्हण्यम हे माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. चेन्नईतून सुब्रम्हण्यम यांना सीबीआयने अटक केली आहे. ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली.

तीन दिवस सीबीआयने आनंद सुब्रम्हण्यमची चौकशी केली होती. चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला होता. सीबीआय आनंद सुब्रमण्यम यांचीही एनएसई को-लोकेशन घोटाळा प्रकरणी चौकशी करत होती. ते तपास यंत्रणेला सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात येत होते. सीबीआय अज्ञात योगी आणि चित्रा यांच्यात इमेलवर झालेल्या संभाषणाची अधिक माहिती घेत होती, पण आनंद त्याबद्दल नीट सांगत नव्हते.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एनएसईसह अनेक तज्ज्ञांच्या मते हा अज्ञात योगी दुसरा कोणी नसून आनंद हेच आहेत. सेबीला सादर केलेल्या निवेदनात, एनएसईने म्हटले होते की आनंद खरोखर योगी आहे आणि तो बनावट ओळख निर्माण करून चित्रा यांच्याकडून माहिती घेत होता. पण, सेबीने एनएसईचा हा मुद्दा मान्य केला नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami