नवी दिल्ली – आज शुक्रवार ६ मेपासून रशिया आणि भारत या दोन देशांदरम्यानची विमान उड्डाणे पुन्हा सुरू झाली आहेत. दोन महिन्यानंतर ही उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रशियन एअरलाइनचे विमान दिल्लीहून मॉस्कोला गेले. एरोफ्लॉट कंपनीने ८ मार्च रोजी आपली नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली होती. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू केल्यानंतर त्यांनी विमान उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
आज शुक्रवारपासून एरोफ्लॉटच्या एअरबस ३३३ विमानाने दिल्ली ते मॉस्को उड्डाण केले. हे विमान दर सोमवारी आणि शुक्रवारी तीन श्रेणीतील एकूण २९३ प्रवाशांसह उड्डाण करणार आहे. एअरलाइनने गुरुवारी एका निवेदनात याबाबत माहिती दिली होती. या विमानात व्यवसाय, प्रीमियम इकॉनॉमी आणि इकॉनॉमी क्लास असणार आहे.