संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

तरुणाची गळफास लावून आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मालवण – तालुक्यातील चुनवरे गावठणवाडी येथील स्कूबा डायव्हिंग व्यवसाय करणार्‍या श्रीकृष्ण दिनेश परब (29) या अविवाहित तरुणाने बुधवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. मालवण येथे स्कूबा डायव्हिंग करणारा श्रीकृष्ण हा बुधवारी सायंकाळी चार वाजता कामावरून घरी परतला होता. तो रात्री नऊ नंतर घराबाहेर पडल्यानंतर साडे अकरा वाजेपर्यंत दिसून न आल्यामुळे त्याच्या कुटुंबाने शोधाशोध सुरू केली. त्यावेळी घराच्या मागील बाजूस असलेल्या रातांब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत श्रीकृष्ण दिसून आला. त्याचा भाऊ अभय दिनेश परब याने तत्काळ मसुरे पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी श्रीकृष्णचा मृतदेह झाडावरून उतरवून पोस्टमार्टेमसाठी पाठविला. सर्व वैद्यकीय सोपस्कार पार पडल्यानंतर त्याच्यावर चुनवरे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई- वडील,भाऊ असा परिवार आहे.त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami