संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

तळेगाव दाभाडे परिसरात पसरली धुक्याची चादर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

तळेगाव – पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे परिसरात आज मंगळवारी सकाळी सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसून आले.या धुक्यांमुळे वाहनचालकांना सकाळी उशिरापर्यंत लाईट लावून आपली वाहने चालवावी लागली.तसेच धुक्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा वेगही काहीसा मंदावला होता.
आज सकाळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेल्या नागरिकांना समोरचे काही दिसत नव्हते.तसेच दुध वितरक,वर्तमान पत्र वितरण करणारे आणि कामावर जाणारे कामगार धुक्यामुळे त्रासलेले दिसत होते.या परिसरातील डोंगर,इमारती आज सकाळी धुक्यात बुडाल्या होत्या.दुसरीकडे या धुक्याचा परिणाम सध्या काढणीस आलेल्या भात,
ऊस आदि पिकांवर मात्र होणार नसल्याचे बोलले जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami