संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

तवांग मुद्द्यावरून संसदेत गदारोळ सोनिया गांधींसह विरोधकांचा सभात्याग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- संसदेत तवांग मुद्द्यावरून आज पुन्हा एकदा संसदेत गदारोळ झाला. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली होती . त्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस, आरजेडी, आम आदमी पार्टी, एमडीएमके, सीबीएम, सीपीआय, जेडीयू, डीएमके, टीएमसी आणि टीडीपीच्या खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभेतून सभात्याग केला.

तवांग मुद्द्यावर लोकसभेत चर्चेसाठी काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली.काँग्रेस खासदार मनीष तिवारी म्हणाले की, एप्रिल 2020 पासून भारत आणि चीनमधील तणावावर संसदेत एकदाही चर्चा झाली नाही. आपले शूर सैनिक चीनला चोख प्रत्युत्तर देत आहेत, मात्र चीन सीमेवर तणाव का वाढवत आहे, यावर संसदेत व्यापक चर्चा होण्याची गरज आहे.त्यानंतर लोकभेत गदारोळ झाल्याने विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाजही दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. तत्पूर्वी आज सकाळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या चेंबरमध्ये भारत-चीन वाद आणि इतर मुद्द्यांवर संयुक्त रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची चर्चा झाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami