नवी दिल्ली – एआयएमआयएमचे प्रमुख असूदुद्दीन ओवेसी यांनी बांगलादेशच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या कर्नाटकातील हिजाब बंदीवर सुरू असलेल्या निदर्शनांबाबत केलेल्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे. त्यांनी तस्लिमा नसरीन यांचे वर्णन द्वेषाचे प्रतिक असे केले आहे. नुकत्याच एका प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत असुदूद्दीन ओवेसी म्हणाले की, द्वेषाचे प्रतीक बनलेल्या व्यक्तीला मी येथे बसून उत्तर देणार नाही. निर्वासित असलेल्या आणि भारताच्या तुकड्यांवर पडलेल्या व्यक्तीला उत्तर देण्यास मी बांधील नाही.
बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब परिधान करण्यावरून वक्तव्य केल्यानं वादात सापडल्या. इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या एका खास मुलाखतीत तस्लिमा नसरीन यांनी हिजाब, बुरखा किंवा निकाब हे दडपशाहीचे प्रतीक आहेत, असा दावा करत, “हिजाब, बुरखा किंवा निकाब हे दडपशाहीचे प्रतीक आहेत. काही मुस्लिमांना वाटते की हिजाब आवश्यक आहे, तर काहींना वाटतं आवश्यक नाही. परंतु, हिजाबची सुरुवात ७ व्या शतकात काही दुष्कर्मवाद्यांनी केली. कारण त्या वेळी स्त्रियांना वस्तू म्हणून वागवले जात होते. त्यामुळे स्त्रियांनी स्वतःला पुरुषांपासून लपवून ठेवण्यासाठी हिजाब किंवा बुरखा घालावा लागतो, असे कर्नाटकमध्ये झालेले हिजाब प्रकरण तापल्यानंतर तस्लिमा नसरीन यांनी हे वक्तव्य केले.
दरम्यान, तस्लिमा यांच्या या वक्तव्यावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया देत त्या द्वेषाचे प्रतीक असल्याचं म्हटलंय. तर या खास मुलाखतीत असदुद्दीन ओवेसी म्हणाले,मी इथे बसून द्वेषाचे प्रतीक बनलेल्या व्यक्तीला उत्तर देणार नाही. ज्या व्यक्तीला आश्रय दिला गेलाय आणि जो भारताच्या तुकड्यांवर पडून आहे. तिच्याबद्दल मी येथे बसून बोलणार नाही,” असे म्हणत त्यांनी तस्लिमा नसरीनला सुनावलं.
भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. भारत हा बहु-सांस्कृतिक, बहु-धार्मिक देश आहे. पण मला कोणीही कसे वागावे हे सांगू शकत नाही आणि कोणीही मला माझा धर्म सोडण्यास, माझी संस्कृती सोडण्यास सांगू शकत नाही,” असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.