संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

तांत्रिक बिघाडामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्याची बत्ती ६ तास गुल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – लोणीकंद आणि चाकण येथील महापारेषणच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर लाइनमध्ये आज पहाटे ४.३०च्या सुमारास ५ ठिकाणी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे कोथरूड व शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडचा वीजपुरवठा खंडित झाला. चाकण एमआयडीसी, लोणीकंद आणि वाघोली परिसराचीही वीज गायब झाल्यामुळे सामान्य नागरिक आणि व्यवसायिकांची गैरसोय झाली. तब्बल ६ तास वीजपुरवठा खंडित झाला होता, असे नागरिकांनी सांगितले.

गडद धुके आणि दव यामुळे टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग झाले. यामुळे ४०० केव्ही अतिउच्च दाबाची २ उपकेंद्रे बंद पडली. त्यांना तात्काळ पर्यायी वीजपुरवठा होऊ शकला नाही. परिणामी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण परिसराचा वीजपुरवठा पहाटेपासून खंडित झाला. चाकण एमआयडीसीचा वीजपुरवठा खंडित झाल्याने त्याचा फटका कंपन्या आणि कारखान्यांना बसला. जवळपास ५ ते ६ तास बिघाड शोधण्याचे आणि दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यानंतर काही भागांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. आता आणखी काही बिघाड शोधण्याचे आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे, असे महापारेषण आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे नागरिक आणि व्यवसायिकांची मात्र गैरसोय झाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami