मुंबई -विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून मोठे महाभारत घडले होते. मात्र तांबे निवडून आल्यावर आपल्या उमेदवारीवरून कसे राजकारण घडले याबाबत त्यांनी खुलासा केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पक्षातूनच टीका होऊ लागली. अखेक सत्यजित तांबे प्रकरणात काही चुका झाल्याची कबुली नाना पटोले यांनी दिली आहे.
तांबे प्रकरणात ‘एबी फॉर्म’चा काय घोळ झाला होता, असा प्रश्न प्रसारमाध्यमांकडून विचारल्यावर नाना पटोले म्हणाले, “१० जानेवारील प्रदेश नागपूरला प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडली होती. तेव्हा संघटना सचिवांना एबी फॉर्म देण्यास सांगितले होते. त्यानुसार फॉर्म देण्यात आला होता; पण तो नागपूरचा असल्याचं समोर आलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ११ तारखेला बाळासाहेब थोरातांच्या जवळील व्यक्ती मनोज शर्मांकडे दुसरा फॉर्म पोहचवण्यात आला. पण मग, सुधीर तांबेंनी उमेदवारी दाखल करायला हवी होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यांनी सांगितलं, सत्यजीतचे नाव लिहले नसल्याने आम्ही अर्ज दाखल केला नाही. परंतु, चुका होताच आणि झाल्या आहेत. वेळेवर दुरुस्त केल्यावर त्याला चूक म्हणत नाही. हा कुटुंबाचा वाद आहे. कुटुंबाचा वाद पक्षावर येऊ नये, याची काळजी सर्वांना घेतली पाहिजे,” असा सल्ला नाना पटोलेंनी दिला आहे.