संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 07 December 2022

ताजमहाल आमचाच! जयपूर राजघराण्याने सांगितला हक्क

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जयपूर – वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद-काशी विश्वनाथ मंदिर वादात आता आग्रा येथील ताजमहाल चर्चेत आला आहे. त्यातच आता जयपूरच्या राजघराण्याने ताजमहालवरून नव्या वादाची ठिणगी टाकली आहे. राजसमंदच्या खासदार आणि शाही परिवारातील दिया कुमारी यांनी मोठे विधान केले आहे. दिया कुमारी म्हणाल्या की, त्यावेळी मुघलांचे राज्य होते पण ती संपत्ती आमची होती. ही मालमत्ता आमचा वारसा होती. याबाबत आमच्या पुस्तकांमध्ये नोंद आहे. ताजमहालच्या बंद दरवाज्यांची गुपिते उघडली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

ताजमहालाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्यात याव्यात, जेणेकरून तेथे देवी-देवतांच्या मूर्ती आणि शिलालेख आहेत की नाही? हे कळू शकेल, असे म्हटले होते. ताजमहालवरून वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा मंदिर पाडून ताजमहाल बांधल्याचा दावा करण्यात आला आहे. 

आग्रा येथील प्रसिद्ध ताजमहाल जयपूर राजघराण्याच्या भूमीवर बांधला गेला आहे. ताजमहालची जमीन आमच्या पूर्वजांची आहे. मुघल सम्राट शाहजहानने जयपूर राजघराण्याची जमीन बळकावल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. न्यायालयाने आदेश दिल्यास कागदपत्रेही देऊ, असेही त्यांनी म्हटले आहे. हा दस्तऐवज राजघराण्यातील पोथीखान्यात असून ताजमहालच्या बंद खोल्या उघडल्या पाहिजेत, यातून अनेक सत्य बाहेर येतील, असाही त्यांनी दावा केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami