तालिबानच्या पाकिस्तान प्रेमामुळे ‘सार्क’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची नियोजित बैठक रद्द

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

न्यूयॉर्क – तालिबानच्या पाकिस्तानवरील प्रेमामुळे सार्क देशांच्या दक्षिण आशियाई संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांची अनौपचारिक बैठक रद्द करण्यात आली आहे. या बैठकीत तालिबानचा प्रतिनिधी समाविष्ट करण्याच्या आग्रहावर पाकिस्तान ठाम होता. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये होणारी सार्क’ गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक मतभेदांमुळे रद्द करावी लागली.

२०२० मध्ये कोरोना विषाणूमुळे सार्क देशांच्या मंत्रिमंडळाची बैठक ऑनलाइन झाली होती. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की सर्व सदस्य देशांच्या सहमती अभावी बैठक रद्द करण्यात आली आहे. अनौपचारिक बैठकीत तालिबान राजवटीला अफगाणिस्तानचे प्रतिनिधीत्व करण्याची परवानगी देण्याच्या पाकिस्तानच्या विनंतीचा विचार करण्यास सार्कच्या बहुतांश सदस्य देशांनी नकार दिल्याचा दावा या सूत्रांनी केला आहे.अशरफ घनी यांच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीला सार्कच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत कोणत्याही किंमतीत परवानगी दिली जाणार नाही. मात्र यावरही या बैठकीमध्ये अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्याचा आग्रह पाकिस्तानने धरला होता. त्यामुळे बहुतेक सदस्य देशांनी पाकिस्तानच्या या विनंतीस विरोध केला. त्यानंतर एकमत होऊ शकले नाही आणि २५ सप्टेंबर रोजी होणारी सार्क परराष्ट्र मंत्र्यांची बैठक रद्द करावी लागली.

अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेचा सहभाग असलेल्या ‘सार्क’ मध्ये पाकिस्तान व्यतिरिक्त अन्य कणत्याही देशाने तालिबानच्या सहभागाबद्दल आग्रह धरला नाही. अफगाणिस्तानच्यावतीने संयुक्त राष्ट्रातील अफगाणी प्रतिनिधींना सहभागी करून घेता आले असते. मात्र तालिबानच्या सहभागाबद्दल एकमत न होऊ शकल्याने ही बैठकच रद्द करण्यात आली. सार्क ही दक्षिण आशियातील आठ देशांची संघटना आहे, ज्याचे पूर्ण नाव दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्यासाठी असोसिएशन आहे. ८ डिसेंबर १९८५ रोजी सार्कची स्थापना झाली. परस्पर सहकार्याद्वारे दक्षिण आशियात शांतता आणि प्रगती साधणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

Close Bitnami banner
Bitnami