संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बरवर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक राहील. पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर रविवारी सकाळी 10.00 ते 15.00 वाजेपर्यंत 5 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील सर्व उपनगरीय गाड्या जलद मार्गावर आणि सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावरील सर्व उपनगरी गाड्या वळवण्यात येतील. सर्व धीम्या उपनगरीय गाड्यांना विलेपार्ले स्थानकावर दुहेरी थांबे दिले जातील तर जलद मार्गावर फलाट उपलब्ध नसल्यामुळे दोन्ही दिशेच्या उपनगरीय गाड्या राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami