संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

तिसरं महायुद्ध हे अणूयुद्धच, पुतिनचा रेड अलर्ट; रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याकडून जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – रशिया-यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरु होऊन आता ७ दिवस पूर्ण झाले आहेत. रशियानं त्यांच्या न्यूक्लिअर डिटरन्स फोर्सला सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध अणवस्त्र युद्धाच्या दिशेने जाणार का याची भीती व्यक्त करण्यात येत होती. काही तज्ज्ञांनी सध्या सुरु असलेला वाद तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात असल्याचं म्हटलं होतं. आता रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्जी लावरो यांनी तिसरं महायुद्ध हे अणवस्त्रांचं असून विनाशकारी असेल, असा इशारा दिला आहे.

त्यामुळं रशिया आणि युक्रेन युद्धामुळं जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचं स्पष्ट झालंय. हे युद्ध मनुष्यांसाठी विनाशकारी ठरण्याची शक्यता आहे. रशियानं युक्रेनच्या नाटोमधील समावेशाच्या मुद्याला विरोध करत आक्रमण केलं आहे. रशियाकडून यूक्रेनमधील लष्करी तळांवर हल्ले केल्यानंतर आता मानवी वस्तीत हल्ले सुरु करण्यात आले आहेत. रशियावर युरोपियन देशांनी निर्बंध जाहीर केले आहेत. रशियाला एकटं पाडण्यााचा प्रयत्न नाटो देशांकडून करण्यात येत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी न्यूक्लिअर डिटरन्स फोर्सला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तिसरे महायुद्ध हे अणवस्त्रांनी लढलं जाईल आणि ते विनाशकारी असेल, असे म्हटले आहे. त्यामुळे जगावर आता तिसऱ्या महायुद्धाचं संकट घोंघावणार का हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.

विशेषतः आंतरराष्ट्रीय विषयाच्या जाणकारांच्या माहितीनुसार रशियाकडे फादर ऑफ बॉम्ब आहे. जर रशियानं त्याचा वापर केल्यास युरोपचं नाही तर पूर्ण जग उद्धवस्त होऊ शकतं. पुतिन यांना त्यांच्या अणवस्त्रांची क्षमता माहिती आहे. यामुळं ते वारंवार अणवस्त्र वापरण्याची धमकी देत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami