आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तिसऱ्या तिमाहीत GDP ५.८ टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे. तसेच २०२२ या वर्षी भारताचा आर्थिक वाढीचा अंदाज ८.८ टक्के असू शकतो असा अहवाल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इकोरॅपच्या रिसर्च रिपोर्टमध्ये मांडण्यात आला आहे.
येत्या २८ फेब्रुवारी रोजी तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 8.4 टक्के दराने वाढली. मात्र, जुलै-सप्टेंबरमधील GDP वाढीचा दर मागील तिमाहीतील 20.1 टक्के वाढीपेक्षा कमी होता.
‘SBI नॉकास्टिंग मॉडेलनुसार, आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत अंदाजे GDP वाढीचा दर 5.8 टक्के असेल. संपूर्ण वर्षासाठी (आर्थिक वर्ष 2021-22) GDP वाढीचा अंदाज 9.3 टक्क्यांवरून 8.8 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे’, असं SBI च्या अहवालात म्हंटले आहे.