संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

तीन टक्के घटस्फोट मुंबईतील ट्राफिकमुळे होतात- अमृता फडणवीस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे एक वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे तीन टक्के जोडप्यांचे घटस्फोट होत असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. हा नवीन जावईशोध लावला असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.

मुंबईतील एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईतील वाहतूक कोंडीवर भाष्य करताना घटस्फोटाशी संबंध जोडला. त्या म्हणाल्या की, मुंबईत वाहतूक कोंडी वाढली असून खड्ड्यांमुळे आणखीच कोंडी होत आहे. एक सामान्य नागरीक म्हणून आपल्याला वाहतूक कोंडीचा हा त्रास सहन करावा लागत आहे.मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे तीन टक्के जोडप्यांचे घटस्फोट होतात. कारण या कोंडीमुळे तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्या या दाव्यावर टीका केली. पेडणेकर म्हणाल्या की, मागील काही महिन्यांपासून ‘ऐकावे ते नवल’, अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यात येत आहेत. भाजपच्या संबंधित लोकांमुळे होत असलेल्या वक्तव्यामुळे लोकांचे करमणूक होते. मात्र, आता लोकंही त्यांच्या अशा वक्तव्याला कंटाळले आहेत .मुंबईतील रस्ते गुळगुळीत आहेत, असा दावा आम्ही कधीही केला नाही. मात्र, रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतची माहिती मिळताच ते खड्डे बुजवले जात आहेत. वाहतूक कोंडीमुळे लोकांचे घटस्फोट होत आहेत, हे विधान चुकीचं आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami