संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

तीन मित्र एकाचवेळी निघाले अखेरच्या प्रवासाला, पाहून सोलापूर हळहळलं

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सोलापूर – मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर खोपोलीजवळ बोरघाटात झालेल्या अपघातात ४ जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये सोलापूरमधील तीन मित्रांचा समावेश होता. काल या तिनही मित्रांची एकाचवेळी अंत्ययात्रा निघाली, त्यावेळी संपूर्ण शहर हळहळलं. त्यांच्या अंत्ययात्रेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोकाकुल वातावरणार तिघांना शेवटचा निरोप देण्यात आला.

दरम्यान, सोलापुरात त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खोपोलीजवळ झालेल्या भीषण अपघातात गौरव खरात, सौरव तुळसे आणि सिद्धार्थ राजगुरु या तीन मित्रांचा मृत्यू झाला होता. मृत गौरव खरात हे काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. नितीन राऊत यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. सोलापुरातील मोदी स्मशानभूमीत एकाचवेळी या तीन मित्रांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सुशीलकुमार शिंदे, नितीन राऊत यांनी शोक व्यक्त केला आहे. एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ६ ते ७ वाहने एकमेकांना धडकली यात ट्रक आणि टेम्पोच्यामध्ये स्विफ्ट कारचा अक्षरशः चुराडा झाला. कारमधील चौघेही जागीच ठार झाले.तर या अपघातात ५ जण किरकोळ जखमी झाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami