संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 29 March 2023

तीन रुपयांच्या पेनी शेअरने दिला ६५ हजार टक्के परतावा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सध्या मल्टिबॅगर पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढतो आहे. अनेक पेनी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. असाच एक पेनी स्टॉक म्हणजे एसआरएफ शेअर.

एसआरएफ शेअरने गुंतवणूकदारांना ६५ हजार २५९ टक्के परतावा दिला आहे. २०२१ मधील हा मल्टीबॅगर स्टॉक ठरला आहे. २० वर्षांपूर्वी या शेअरची किंमत ३ रुपये ७१ पैसे होती. मात्र, आज या शेअरची किंमत २ हजार २४.५० पैसे झाली आहे. म्हणजे २० वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना ६५,२५० टक्के परतावा दिला आहे.

गेल्या वर्षभराचा विचार करायचा झाल्यास या कंपनीने महिन्यांत ३.५ टक्क्यांनी परतावा दिला. गेल्या महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत २३४९ होती, ती आता २४२४ झाली आहे. तर गेल्या सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कारण सहा महिन्यांपूर्वी शेअर १८१२ रुपये होता तर तो आता २४२ रुपये झाला आहे. वर्षभाराचा विचार करायचा झाल्यास या कंपनीने वर्षभरात १२५ टक्के परतावा दिला आहे. ५ वर्षांमध्ये हा मल्टीबॅगर केमिकल स्टॉक 315 रुपये ते 2424 रुपयेपर्यंत गगनाला भिडला आहे.

दहा वर्षांपूर्वी SRF शेअरची किंमत 54.54 रुपये (NSE वर 24 फेब्रुवारी रोजी बंद होणारी किंमत) वरून आज 2424.50 रुपयांपर्यंत वाढली आहे, या कालावधीत सुमारे 4350 टक्के वाढ नोंदवली आहे. त्याच वेळी गेल्या 20 वर्षात तो 3.71 रुपयांच्या पातळीवरून 2424.50 रुपयांपर्यंत वाढला आहे. 

म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख रुपये आज 1.03 लाख झाले असते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या