संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

तीन वर्षांंनंतर प्रथमच आजपासून नेरळ-माथेरान टॉयट्रेन सुरू होणार !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मध्य रेल्वेने नेरळ – माथेरान जाणार्‍या पर्यटकांना दिवाळी सणामध्ये मोठे गिफ्ट दिले आहे.नेरळ-माथेरान मिनी टॉय ट्रेन सर्व्हिस पुन्हा सुरू होणार आहे.नेरळ-माथेरान टॉय ट्रेनच्या उद्या शनिवारी २२ ऑक्टोबरपासून रोजच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ऑगस्ट २०१९ पासून बंद होती.

प्रचंड पावसामुळे तीन वर्षांपूर्वी घाटातील ट्रॅक पूर्णतः वाहून गेले होते.या ठिकाणी ट्रॅकसाठी जमीन उरली नव्हती,त्यामुळे संपूर्ण मार्ग पुन्हा नव्याने बांधावा लागला.आता नव्याने बांधलेल्या मार्गावरून या टॉयट्रेनच्या नेरळ ते माथेरान दोन आणि माथेरान ते नेरळ दोन अशा एकूण चार फेऱ्या दिवसभरात चालणार आहेत.तर अमन लॉज ते माथेरान दरम्यान दिवसाला १२ फेऱ्या चालणार आहेत. काल मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केल्या नंतर हिरवा कंदील दाखवला.मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही गाडी आता नेरळहून सकाळी ८.५० वाजता निघून ११.३० वाजता माथेरानला पोहोचेल आणि दुसरी गाडी दुपारी २.२० वाजता निघून सायंकाळी ५ वाजता माथेरानला पोहोचेल.तसेच माथेरान येथूनही रोज दुपारी २.४५ वाजता आणि ४.२० वाजता नेरळसाठी ही टॉयट्रेन सुटेल.या दोन्ही गाड्या सायंकाळी ५.३० आणि सायंकाळी ७ वाजता नेरळला पोहोचतील. या गाडीला विस्ताडोम आणि दोन द्वितीय श्रेणी कम सामान श्रेणीचे डबे असणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami