संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

तुम्हाला चेकचे प्रकार माहित आहेत?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

धनादेश किंवा चेक ही पेमेंटची लोकप्रिय पद्धत आहे. चेकने व्यवहार करणे सर्वात सुरक्षित मानले जाते. मात्र धनादेशाचे काही प्रकार आहेत, यामुळे अनेकांचा गोंधळ होतो. आज आपण यासंदर्भात माहिती घेऊया. कोणताही धनादेश त्याच शहरात क्लिअर होत असेल तर त्याला स्थानिक चेक म्हणतात. तर शहराबाहेर नेऊन स्थानिक चेक क्लिअर केल्यास त्याला आउटस्टेशन चेक म्हटले जाते. आउटस्टेशन चेकसाठी बँकेकडून निश्चित शुल्क आकारले जाते. तसेच 1 लाख रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या धनादेशांना सामान्य मूल्याचे धनादेश म्हणतात आणि 1 लाख रुपयांच्या वरच्या धनादेशांना उच्च मूल्याचे धनादेश म्हणतात. प्रिय व्यक्तींना भेट म्हणून दिलेल्या चेकला गिफ्ट चेक म्हणतात. गिफ्ट चेकची रक्कम 100 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंत असू शकते.

आदेश चेक (Order Cheque)

या चेकमध्ये bearer हा शब्द खोडलेला असतो आणि त्याच्या जागी order लिहिलेले असते. यात, कोणीही धनादेशाद्वारे त्याच्या खात्यात पैसे हस्तांतरित करू शकतो किंवा चेकच्या मागील बाजूस स्वाक्षरी करून इतर कोणत्याही व्यक्तीस अधिकृत करू शकतो.

पोस्ट डेटेड चेक (Post Dated Cheque)

भविष्यातील तारखेसाठी जारी केलेल्या धनादेशांना पोस्ट डेटेड चेक म्हणतात. देशात पोस्ट-डेटेड चेकचा कालावधी 3 महिन्यांचा आहे.

स्टॉल चेक (Stale Cheque)

जारी केलेला धनादेश 3 महिन्यांनंतर वापरला गेला नाही तर अशा चेकला स्टॉल चेक म्हणतात.

अँटी-डेटेड चेक (Ante-dated Cheque)

अँटी-डेटेड चेक म्हणजे मुदत संपलेला चेक जो नंतर बँकेत जमा केला जातो. मात्र तो 3 महिन्यांच्या आत जमा करणे आवश्यक आहे.

ओपन चेक (Open Cheque)

ओपन चेक असलेली व्यक्ती काउंटरवर जाऊन तो चेक दाखवून पैसे घेऊ शकते किंवा पैसे त्याच्या खात्यात ट्रान्सफर करू शकते.

बेअरर चेक (Bearer Cheque)

बेअरर हा असा चेक आहे जो खातेदाराच्या कोणत्याही प्रतिनिधीने बँकेत जाऊन कॅश केला जाऊ शकतो. प्रतिनिधीला धनादेश देताना धनादेशावर मागे सही करण्याची गरज नसते. धनादेश देऊन पैसे काढले जाऊ शकतात. हा चेक जोखमीचा आहे. कारण हा चेक हरवला तर कोणीही बँकेत जाऊन तो कॅश करू शकतो.

क्रॉस चेक (Crossed Cheque)

क्रॉस केलेला चेक एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या नावाने लिहिलेला असतो आणि त्यात वरच्या डाव्या बाजूला दोन समांतर रेषा काढल्या जातात. त्यावर “& CO.” or “Account Payee” or “Not Negotiable” असे लिहिले जाऊ शकते किंवा तो कोराही असू शकतो. या धनादेशातून कोणतेही रोख पैसे काढले जात नाहीत आणि संबंधित रक्कम केवळ नामनिर्देशित व्यक्ती/संस्थेच्या खात्यात असू शकते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami