संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

तुर्की-सीरिया भूकंप २४ हजार बळी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अंकारा:- तुर्कस्तान आणि सीरियाला हादरवलेल्या सोमवारच्या विनाशकारी भूकंपानंतर मृतांची संख्या किमान २४,००० वर पोहोचली आहे. ८५ हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली.या भीषण आपत्तीतील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. तुर्की आणि सीरियामध्ये झालेला भूकंप हा दोन दशकांतील सर्वात भीषण भूकंप आहे.

दरम्यान भूकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीसाठी भारताने मदतीचा हात दिला आहे. ‘ऑपरेशन दोस्त’द्वारे भारत भूकंपग्रस्त भागात मदत पोहोचवत आहे. भूकंपग्रस्ताच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या तीन पथकांना विशेषत: श्वानपथक, वैद्यकीय आणि इतर आवश्यक उपकरणांसह भारतातून तुर्कीला पाठवण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या