संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

तेलंगणात एसटी समाजाचे आरक्षण ६ वरून १० टक्के

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

हैदराबाद – तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर यांच्या सरकारने राज्यातील एसटी प्रवर्गासाठी म्हणजेच अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण जाहीर केले आहे.शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकरीमध्ये अनुसूचित जातीतील एसटी समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.सध्या या समाजाला ६ टक्के आरक्षण असून त्यात आता ४ टक्क्यांनी वाढ करुन ते १० टक्के करण्याचा निर्णय करण्यात आले आहे.

एका जाहीर सभेत मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार लवकरच सरकारी नोक-या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जमातींसाठी आरक्षण मर्यादा १० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा आदेश जारी करणार आहे. वास्तविकता २०१७ मध्ये विधानसभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. हे विधेयक राष्ट्रपती यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते.मागील ६ वर्षांत राज्य सरकारने यासंदर्भात अनेक अर्ज पाठवले होते, तरीही हे प्रकरण अजुनही प्रलंबित आहे,असे शासन आदेशात म्हटले आहे.
तेलंगणा सरकारने शैक्षणिक संस्था आणि राज्य सरकारी नोक-यांमधील प्रवेशांमध्ये अनुसूचित जमातींसाठी आरक्षण मर्यादा ६ टक्क्यांवरून १० टक्के करण्याचा आदेश जारी करण्यात आला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami